रयत शेतकरी संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
पुणे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना देण्यात आले नियुक्तीचे पत्र
वाघोली : पुणे जिल्हा रयत शेतकरी संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष रविप्रकाश बापूसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
पुणे जिल्हा नवनियुक्त पदाधिकारी :
कल्पना गणेश गव्हाणे (रा. बोरी भडक, ता. दौंड) पूणे जिल्हा महिला अध्यक्ष, हेमंत दादासाहेब चौधरी (ता. हवेली) पुणे जिल्हा कार्यध्यक्ष, अनिल खंडू शिवले (रा. तुळापूर ता. हवेली) पुणे जिल्हा उपाध्यक्ष पश्चिम विभाग, अजय सावंत (रा. वाघोली) पुणे जिल्हा सरचिटणीस, पांडुरंग विठ्ठल नागवडे (रा. शिरसवडी, वाडेबोळाई) हवेली तालुका सचिव, माधुरी दशरथ थिटे (रा. डिंग्रजवाडी) पुणे जिल्हा महिला कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष रविप्रकाश बापूसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. संघटनेचे ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणार असून संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी सुशील शिंदे, अनिल कोतवाल, सुभाष टीकोळे, संतोष शिवले, राजेंद्र शिवले, सागर कांचन, संदीप गव्हाणे, बाबा गव्हाणे, निखिल कांचन, मोनू बडेकर, आबा देवकर, निलेश वारघडे, अमोल शिंदे, नितीन इंगळे, दादा गव्हाणे, ग्रामस्थ, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.