ख्रिस्ती समाजाच्या समस्या  सोडवणार – बापूसाहेब पठारे

मार्कस पंडित यांच्या माध्यमातून सर्व कॅथोलिक चर्चचा चर्चासत्रात सहभाग; पठारे यांना ख्रिस्ती समाजाचा जाहीर पाठींबा

पुणेखराडी येथे ख्रिस्ती समाजाचे नेते मार्कस पंडीत यांच्या नेतृत्वाखाली ख्रिस्ती समाजाच्या विविध समस्यांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रमुख उपस्थित हे चर्चासत्र पार पडले. याप्रसंगी बापूसाहेब पठारे यांनी ख्रिस्ती समाजाच्या विविध समस्या विधानसभेत मांडून सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले.

यावेळी संत फ्रान्सिस डी सेल्स चर्च, डीव्हाईन मर्सी चर्च, क्राईस्ट द किंग चर्च, कार्मिल चर्च, होली फॅमिली चर्च लोहगाव त्याचप्रमाणे कॅथलिक असोसिएशन ऑफ पुणे, वडगावशेरी मायनॉरीटी काँग्रेस आय पार्टी, ख्रिश्चन कोकणी संघटना, तमिळ ख्रिचन संघटना, एस एफ मराठी कॅथलिक संघटना, मिलाग्रास फाउंडेशन वडगावशेरी, पुणे कोकणी ख्रिस्त सभा, ख्रिस्त जागृती मंच या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तरपणे विविध विषयांवर चर्चा केली.

बापूसाहेब पठारे यांना पाठींबा जाहीर करून ख्रिस्ती समाजाच्या समस्या विधानसभेत मांडण्याची केली. ख्रिस्ती समाजाने दिलेला पाठिंबा फार महत्त्वाचे योगदान देणारा ठरेल. येणाऱ्या काळात विविध माध्यमातून ख्रिस्ती समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडू व त्यावर नक्कीच तोडगा काढू तसेच मदर तेरेसा महामंडळाची स्थापना करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. तसेच ख्रिश्चन समाजातील तरुण-तरुणींसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे बापूसाहेब पठारे यांनी आश्वासन दिले.

यावेळी जयप्रकाश पारखे (सचिव, महाराष्ट्र राज्य प्रोग्रेसिव्ह पीपल काँग्रेस पक्ष), जॉन फर्नाडिस (अध्यक्ष, मिलाग्रास फाउंडेशन), जो रोड्रिग्ज (अध्यक्ष, कोकणी सभा), एडविन अलेक्स (अध्यक्ष, तामिळ सभा), रविभाऊ कांबळे (अध्यक्ष, मराठी सभा व सरचिटणीस, काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती जमाती), जो कसबे (पुणे धर्मप्रांत अध्यक्ष कॅथलिक असोसिएशन), ए वी थॉमस (धानोरी चर्च), स्वप्नील साळवे (सर क्राईस्ट द किंग चर्च), मॅथ्यू थॉमस (कार्मेल चर्च), पासकल लोपोझ, मधुकर सदाफुले, अमर पंडीत यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button