Video: माऊली कटके यांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकदीने उतरणार – विजय जाचक
वाघोली शहर भाजपाने परिवर्तनाच्या लढाईचा फुंकला शंख

वाघोली : शिरूर-हवेली विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बंडखोरी शमविण्यात यश आले असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रमुख लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपा वाघोली शहर पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले असून माऊली कटके यांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकदीने उतरणा असल्याचे विजय जाचक यांनी सांगितले. सोमवारी वाघोली शहर भाजपाच्या वतीने परिवर्तनाच्या लढाईचा शंख फुंकला आहे.
सोमवारी सायंकाळी वाघोली शहर भाजपाच्या वतीने सोमवारी (दि. ४ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजता पुणे-नगर महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून प्रचाराचा शंख फुंकला आहे. महायुतीचे उमेदवार यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.
शिरूर-हवेलीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अशोक पवार यांच्यामध्ये प्रमुख लढत पहावयास मिळणार आहे. ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असलेतरी प्रमुख लढत दोन राष्ट्रवादीमध्ये होणार आहे.
भाजपासह महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी माऊली कटके यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे. वाघोली शहर भाजपाच्या वतीने सोमवारी सायंकाळी महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर आबा कटके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.