श्रीमंतांना कोठडीत पिझा घेऊन जाणारा प्रतिनिधी निवडू नका – डॉ. विश्वंभर चौधरी

पुणेयोजनांद्वारे पैसे वाटून मत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण पैशासाठी मत द्यायचे की सुरक्षिततेसाठी द्यायचे हा निर्णय घ्यायची वेळ आली आहे असे प्रतिपादन निर्भय बनो आंदोलनाचे प्रणेते अॅड. असीम सरोदे यांनी केले. तर ‘गरिबांसाठी वडापाव घेऊन जाणारा आमदार निवडा. श्रीमंतांना कोठडीत पिझा घेऊन जाणारा प्रतिनिधी निवडू नका असे आवाहन डॉ. विश्वंभर चौधरी यांनी केले.  

निर्भय बनो आंदोलनाच्या वतीने संविधान प्रचारक चळवळ यांच्या   जेसीडी पार्क, मोझे नगर, येरवडा येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. अॅड. असीम शेख, डॉ. विश्वंभर चौधरी, इब्राहिम खान, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, स्मिता ताई, बाळकृष्ण निढाळकर   यांच्यासह अनेक मान्यवरांनी विचार मांडले. ‘अन्यायाविरुद्ध न्यायाच्या लढाईत निर्भय बनो, भारत जोडो’ असा संदेश या सभेने दिला. सभेला स्थानिक नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. 

अॅड. सरोदे म्हणाले माणुसकी हवी असेल तर महाविकास आघाडीला मतदान केले पाहिजे. महिलांचा आदर असेल तर महिलांच्या प्रकरणात राजकीय फायदा घेण्याचे काम भाजप नेते का करतात? ते सतत असे  करीत आले आहेत. बदलापूर प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात चालढकल का केली गेली. तेथील संस्था संघ, भाजपशी संबंधित असल्याने त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न झाले. राहुल गांधी यांच्या संविधान संबंधी भूमिकेचे जगभर स्वागत झाले आहे. संविधान द्वेष शिकवत नाही, प्रेम शिकवते. संविधान पुस्तकावरून राजकारण करणे हे फडणवीस यांना शोभते का? त्यांना संविधान कळते का? हे मनुस्मृती मानणारे लोक आहेत. त्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे की ते संविधान मानतात का?

डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले गरिबांसाठी वडापाव घेऊन जाणारा आमदार निवडा श्रीमंतांना कोठडीत पिझा घेऊन जाणारा प्रतिनिधी निवडू नका. पुण्याची इज्जत कोणी घालवली? माणुसकीला काळे फासणारी ही घटना आहे. आम्ही पुण्यात यासाठीच सभा घेतली, कारण यांना धडा शिकवला पाहिजे. आपण बिल्डरांचा प्रतिनिधी निवडता कामा नये. सामान्य माणसांचा प्रतिनिधी निवडला पाहिजे. वोट जिहाद म्हणून भाजपचे लोक संविधानाचा अपमान करीत आहेत. शिंदे-फडणवीस यांच्याकडे दाखविण्यासारखे काही नाही. खोके सरकारने महाराष्ट्राचा अपमान केला. शिवाजी महाराजांची शान घालवली. मानवता धर्म नष्ट केला. पुण्यावर गुंडांच्या टोळ्या राज्य करणार नाहीत याची काळजी आपण केली पाहिजे. 

हा देश नथुरामचा असेल कि गांधींचा असेल हा प्रश्न आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान राहणार कि नाही हा प्रश्न आहे. घटनेबद्दल प्रेम असेल तर संघपरिवार मनुस्मृतीचे दहन का करीत नाही हा प्रश्न आहे. भ्रष्टाचार उखडून सत्ताधाऱ्यांना सत्तेतून हाकलले पाहिजे असे आवाहनही डॉ. चौधरी यांनी केले. 

व्होट जिहाद हा चुकीचा प्रचार – अॅड. असीम सरोदे

आपण आज सर्व भाजपचे नेते असभ्य बोलताना, वागताना पाहत आहोत. लाथा मारताना पाहत आहोत. आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, कारण ते असंवेदनशील झाले आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संघर्ष करण्याचे शिकवले आहे. सभ्य माणसांची लढाई असभ्य माणसांची आहे. अजित पवार यांनी जे केले त्यातून त्यांना यश मिळणार नाही. व्होट जिहाद हा चुकीचा प्रचार आहे. भाजप जर मुस्लिमांशी वाईट वागत असतील तर ते भाजपला का मतदान करतील हा साधा प्रश्न आहे, असे सरोदे म्हणाले.   

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button