मनोमिलन व्हायला वेळ लागणार नाही – टिंगरे

आमदार टिंगरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपचे पदाधिकारी गैरहजर

वडगावशेरीमहायुतीमध्ये मनोमिलन व्हायला वेळ लागणार नाही. वरीष्ठ पातळीवर नेते मंडळींमध्ये तशी चर्चा सुरू असल्याची माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.

वडगांवशेरी मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांच्याकडे दाखल केला. दरम्यान महायुतीकडून जगदीश मुळीक हे उमेदवारी मागत होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, आरपीआयचे पदाधिकारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनुपस्थित होते. याबाबत पत्रकारांनी टिंगरे यांना विचारले असता त्यांनी लवकरच मनोमिलन होणार असून सर्व प्रचारात सहभागी होतील असे सांगीतले. मतदार संघातून रॅली काढत टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना शहराध्यक्ष दिपक मानकर, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, सतिश म्हस्के, सुनिता गलांडे, संदीप जऱ्हाड,  पांडुरंग खेसे, बंडू खांदवे, चंद्रकांत टिंगरे, सुनील जाधव, शंकर संगम, प्रकाश भालेराव आदि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. टिंगरे म्हणाले, विकास कामांच्या जोरावर आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहे. 

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button