विधानसभेत लोहगाव मधील उमेदवार पाठवण्याचा निर्णय
लोहगाव : लोहगाव विकास कामापासून वंचित असल्याने लोहगावचा आमदार असल्याशिवाय विकास होणार नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत लोहगाव मधून उमेदवार देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. समावेश गावातील शासन नियुक्ती सदस्य असणारे सुनील खांदवे- मास्तर यांना पाठबळ देण्याचा निर्णय झाला.
संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरात झालेल्या या बैठकीला सखाराम खेसे, बापू खेसे, शरद मोझे, सोमनाथ कंद, सोमनाथ खांदवे, नेहा शिंदे, सुरेश रणसिंग, अमित जंगम, संतोष खांदवे, किरण गायकवाड, योगेश निंबाळकर, रवि लोखंडे यासह स्थानिक रहिवाशी, सोसायट्यांचे प्रतिनिधी मोठयासंख्येने उपस्थित होते.
सुनील खांदवे- मास्तर म्हणाले, वडगाव शेरी मतदार संघाला आतापर्यंत प्रत्येक भागातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. आजी- माजी आमदारांनी आपल्याच भागाचा विकास केला आहे. लोकसंख्येने मोठे असलेल्या लोहगावला एकदाही संधी मिळाली नाही. लोहगावचा पुणे महानगर पालिकेत सामावेश होऊनही विकास कामे झाली नाहीत. जर लोहगावचा विकास करायचा असेल तर लोहगाव मधील आमदार झाला पाहिजे असा सर्वांचा आग्रह असल्याने मी विधानसभा निवडणुक लढण्यास तयार झालो आहे. सर्वांचे शेवटपर्यंत पाठबळ मिळाल्यास मी निवडणूक लढण्यास तयार असून नागरिकांनी आशिर्वाद द्यावेत असे आवाहन त्यांनी केले.
कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळवणार
विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले सुनील खांदवे हे सद्या भरतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहेत. ते त्याच पक्षाकडून उमेदवारी मागत आहेत. मात्र भाजपकडून माजी आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार बापुसाहेब पठारे, माजी नगसेवक अनिल टिंगरे हे देखील उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामध्ये आता सुनील खांदवे यांची भर पडली आहे. मात्र वडगावशेरी विधानसभा मतदार संघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँगेसचे (अजित पवार गट) आमदार सुनील टिंगरे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र भाजपकडे मातब्बर इच्छुकांची संख्या अधिक आहे. कसे कुणाला कुठे ॲडजेस्ट होणार याची चर्चा मतदारसंघात आता पासून रंगली आहे.