कोयता गँगच्या म्होरक्याची कारागृहात रवानगी
वाघोली पोलिसांची एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई; एक वर्षासाठी स्थानबध्द

वाघोली : वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी वाघोली येथील कोयता गँगच्या म्होरक्याला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यांतर्गत (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. त्याची छञपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षासाठी रवानगी करण्यात आली आहे.
ओम दादाराव म्हस्के (वय १९, रा. दुबेनगर, वाघोली ता. हवेली जि. पुणे) असे एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील दुबेनगर, बीजेएस फाटा, वाघोली बाजारतळ तसेच आसपासच्या भागात कोयत्याचे सहायाने लोकांना दहशत माजवून वारंवार त्रास देत होता. त्यामुळे परिसरातील रहिवाशी भीतीच्या दडपणाखाली वावरत होते. सदर झोपडट्टी दादामुळे वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने पोलीस उप आयुक्त हिंमत जाधव, सहा. पोलीस आयुक्त प्राजंली सोनवणे, वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार, पोलीस अंमलदार सागर कडू, कमलेश शिंदे यांनी वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासून ओम म्हस्के याचेवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई होणेबाबत पोलीस आयुक्त यांचेकडे प्रस्ताव सादर केला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईचे आदेश काढले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त हिंमत जाधव, सहा. पोलीस आयुक्त प्राजंली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार, पोलीस उपनिरीक्षक दर्शन देवगुडे, पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे, पोलीस हवालदार प्रशांत कर्णवर, प्रदिप मोटे पोलीस अंमलदार सागर कडू, कमलेश शिंदे, गणेश आव्हाळे, साई रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, प्रतिम वाघ, गहिनीनाथ बोयणे यांनी केली आहे.
यापुढे वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत कोयत्याचे सहायाने किंवा सोशल मिडीयाचा वापर करुन दहशत निर्माण करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेऊन अशा प्रकारच्या कारवाईची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे. – पंडित रेजितवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस स्टेशन)