मंगळसुत्र चोरट्याला अटक  

विश्रांतवाडी पोलीसांची कारवाई; चोरी गेलेले मंगळसूत्र व दुचाकी जप्त   

वडगावशेरीविमानतळ रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळून गेलेल्या  चोरट्यास विश्रांतवाडी पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र व गुन्ह्यांत वापरलेली दुचाकी पोलीसांनी जप्त केली.

कृष्णा उर्फ किशोर अशोक पवार (वय २६ रा वडगाव घेणंद, आळंदी ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टिंगरेनगर येथे राहणाऱ्या सोनाली संदीप जाधव सनशाईन हॉटेलचे समोरील रोडवर विमानतळ रोड विश्रांतवाडी येथे मॉर्निंग वॉक करीत असताना त्यांचे पाठीमागून आलेल्या एका मोटार सायकलस्वारने त्यांचे गळयातील ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र हिसका मारुन घेऊन पळून गेले होता. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपीचा पोलीस कर्मचारी तपास करत असताना पोलीस अमजद शेख,  संजय बादरे,  संपत भोसले व किशोर भुसारे यांना आरोपी हा गुन्ह्यात वापरलेले मोपेड (नं. एमएच १४ जे. डब्ल्यु. ४९७२) दुचाकीसह आळंदी परिसरात राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार आरोपीचा तांत्रिक विश्लेषण करुन आळंदी परीसरात शोध घेत असताना मोपेडवरुन एक इसम वेगात जात असताना पोलीसांना दिसला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता तो सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याची सखोल चौकशी असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हयात वापरलेले मोपेड व सोन्याचे मंगळसुत्र असा एकुण ६६ हजार रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव,  सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड,  पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button