श्रेय घेण्यासाठी लोकप्रतिनिधी व इच्छुक उमेदवारांमध्ये चढाओढ

वाघोलीतील विविध भागात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी मनपाने काढले टेंडर

वाघोलीवाघोलीतील गहन प्रश्न असलेल्या ड्रेनेजच्या प्रश्नांसाठी महापालिकेने चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद केली आहे. त्याची टेंडर प्रक्रिया सध्या सुरु आहे. वाघोलीतील विविध भागांमध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पुढील काळामध्ये सुरु होणार आहे. मात्र माझा पाठपुरावा, माझ्या पत्रामुळेच ही तरतूद करण्यात आल्याचा दावा करून त्याचे श्रेय घेण्याची चढाओढ लोकप्रतिनिधी व आगामी निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये सध्या सुरू आहे. सोशल मीडियावर याबाबत जोरदार प्रचार सुरू आहे.

पुणे महानगरपालिकेच्या मलनिःसारण विभागाने याबाबतची निविदा प्रसिद्ध केली आहे. फुलमळा रोडवरील पावसाळी वाहिनी विकसित करण्यासाठी सुमारे तीन कोटी १७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वाघोली येथील संत तुकाराम नगर ते कापुरी विहीर, पूर्व रंग सोसायटी लगत, कमलबाग सोसायटी ते जेड सोसायटी पर्यंत, भावडी रोड अल्फा लॅड मार्क सोसायटी व जाधव वस्ती, जेड सोसायटी (एच पी पेट्रोल पंप) नगररोड ते कावेरी नाल्यापर्यंत ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी चार कोटी १७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर वाघोली येथील केसनंद फाटा परिसर, नायरा पेट्रोल पंप, म्हसोबा मंदिर ते सुप्रिया हॉटेल, जेजे नगर केसनंद रोड, येथील ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी चार कोटी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सर्व प्रक्रियेनंतर पुढील दीड वर्षात ही कामे होणार आहे. या निविदेची जाहिरात व आपण दिलेले पत्र सोशल मीडियावर टाकून श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे. यामध्ये सर्व पक्षीय आजी, माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचा समावेश आहे. दरम्यान या कामानंतर अनेक ठिकाणी पावसानंतर साचणारे पाणी साचणार नसल्याचा गवगवा करून नागरिकांची असुविधा होणार नसल्याचे जणूकाही एकप्रकारे ग्वाहीच दिली जात असल्याने नागरिकही या श्रेय चढाओढीवर गमतीशीर चर्चा करीत आहेत.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button