खंडाळी गावच्या उपसरपंचपदी रिकेश चव्हाण

पुणेराजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खंडाळी (ता. माळशिरस) गावच्या उपसरपंचपदी रिकेश रामचंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

खंडाळी ग्रामपंचायतचे उपसरपंच सुरेखा विठ्ठल पताळे यांनी ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिला. उपसरपंच पदाची जागा रिक्त झाल्याने त्याजागी रिकेश चव्हाण यांची शुक्रवारी (दि. २६) बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली. यापूर्वी विद्यमान सदस्य असताना त्यांनी गावच्या विकासामध्ये कायम आग्रही पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्यांना उपसरपंच पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

यावेळी सरपंच सुनिता सुरवसे, सुरेश सुरवसे, माजी उपसरपंच सुरेखा पताळे, विठ्ठल पताळे, समाधान पताळे, शिवाजी शिंदे, अनिल भोसले, बाबुराव पताळे, ग्रामसेवक सत्यवान पवार, क्लार्क शिवाजी साबळे, पांडुरंग किर्दकर सर्व सदस्य व गावतील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

वेळू ग्रामपंचायत सदस्य म्हणून माझी पहिलीच टर्म आहे. मात्र इतर सहकारी व त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन घेऊन मी गावचा विकास करण्याचा प्रयत्न करेन. यापुढेही विविध योजना आणून गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असेन. माझ्या सहकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास टाकलाय त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांसह ग्रामस्थांचे आभार मानतो.      – रिकेश चव्हाण (उपसरपंच, खंडाळी)

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button