पोलिसांची हातभट्ट्यांवर कारवाई
२ लाख ७० हजार रुपये किंमतीची दारू जप्त

वाघोली : लोणीकंद पोलिसांनी वाडेगाव येथे ओढयालगत असलेल्या गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर कारवाई करत दारू बनविण्यासाठी लागणारा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. यावेळी जेसीबीच्या साह्याने दारू बनवणाऱ्या भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. ३८ हजार लिटर दारू तयार करण्याचे रसायन या ठिकाणी होते. त्याची किंमत तब्बल १६ लाख रुपये होती. तर गुन्हे शाखा युनिट सहाने बकोरी रोडच्या तीन अवैध गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई करून २ लाख ७० हजार रुपये किमतीची दारू जप्त केली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, नितीन घाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.