फुलमळा रस्त्यावर साचले प्रचंड पाणी
मनपा कर्मचारी व अनिल सातव पाटील टीमच्या वतीने मड पंपाद्वारे पाण्याचा उपसा करण्याचे काम सुरु; पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे सातव यांचे आवाहन

वाघोली : वाघोलीत संततधार पाऊस सुरु असल्याने वाघोली येथील फुलमळा रस्त्यावर विद्युत महावितरण कार्यालयासमोर प्रचंड पाणी साचले आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे मनपा कर्मचारी व भाजप युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव यांच्या टीमच्या यांच्या सहकार्याने मड पंपद्वारे पाणी उपसा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. संततधार सुरु असलेल्या पावसामुळे पाणी उपसा करण्यासाठी विलंब लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करून सहकार्य करावे असे आवाहन सातव यांनी केले आहे.
मागील तीन दिवसांपासून संपूर्ण पुणे जिल्ह्यासह वाघोलीत संततधार पाऊस सुरु आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाघोली येथील फुलमाळा रोडवरील विद्युत महावितरण कार्यालयासमोर प्रचंड पाणी साचले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा सामना करावा लागत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी भाजप युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील यांनी साचलेले पाणी काढण्यासाठी महापालिका अधिकारी यांना संपर्क करून प्रत्यक्षात पाहणी केली. त्यानंतर मड पंपाद्वारे साचलेले पाणी उपसण्याचे काम मनपाचे कर्मचारी तसेच अनिल सातव पाटील यांच्या टीम मार्फत सुरु करण्यात आले आहे. अतिवृष्टी निरंतर चालू असल्यामुळे पाणी काढण्यास विलंब होत आहे. तरी देखील रस्त्यात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न चालु आहे. नागरिकांनी सहकार्य करून पूर्वरंग-शांतिवन-सुखवाणी पाल्म, छत्रपती चौक-गगन अधिरा-बकोरी फाटा, संस्कृती स्कुल ते बकोरी फाटा आदी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील यांनी केले आहे.
केतन जाधव यांचे नागरिकांना आवाहन
मागील दोन-तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाघोलीतील अनेक अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचले आहे. पाण्याखाली मोठे खड्डे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुचाकी व चारचाकी चालवताना सावधगिरी बाळगा, तसेच पाण्याच्या प्रवाहात वाहने घालण्याचे धाडस करू नका, विजेचा खांब किंवा ट्रान्सफॉर्मर जवळून जाताना काळजी घ्या, कामाशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन भाजप वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव यांनी नागरिकांना केले आहे.