न्हावी सांडस विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुभाष शितोळे

वाघोली : न्हावी सांडस (ता. हवेली) विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुभाष शिवाजी शितोळे तसेच व्हाईस चेअरमनपदी तानाजी ज्ञानेश्वर शितोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून सोनाली देसाई यांनी काम पहिले. चेअरमनपदी सुभाष शितोळे तर व्हाईस चेअरमनपदी तानाजी शितोळे यांनी बिनविरोध निवड झाल्याची निवडणूक अधिकारी देसाई यांनी घोषित केले.
यावेळी योगेश बाळासाहेब शितोळे, सरपंच नामदेव शितोळे, रामकृष्ण शितोळे, विपुल शितोळे, रामभाऊ शिंदे, रणजित पन्हाळे, संतोष शितोळे, योगेश शितोळे, गणेश शितोळे, रामकृष्ण शितोळे, किरण शिंदे, सागर शितोळे, भरत शितोळे, समीर शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.