बालाजी पार्क परिसरातील रहिवाशांचा प्रश्न मार्गी
पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु; शासन नियुक्त सदस्य संदीप सातव यांनी केला होता पाठपुरावा

वाघोली : वाघोली-केसनंद रोडवरील अनेक दिवसांपासून खराब झालेल्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम बुधवारी सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे बालाजी पार्क परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
वाघोली-केसनंद रोडवरील बालाजी पार्क परिसरातील पाण्याची पाईपलाईन अनेक दिवसांपासून खराब झाली होती. त्यामुळे येथील रहिवाशांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. याबाबत बालाजी पार्क परिसरातील रहिवाशांनी शासन नियुक्त सदस्य तथा भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांचेकडे पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सातव यांनी पुणे महापालिका पाणीपुरवठा अधिकारी अन्वर मुल्ला यांचेकडे पाठपुरावा केला. अखेर बुधवारी (दि.२४ जुलै) पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु झाले आहे. पाईपलाईनचे काम सुरु झाल्याने रहिवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.