‘यशवंत’सह वाघोलीतील विविध प्रश्नांसंदर्भात भाजप व यशवंत सह. कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी पीएमआरडीए आयुक्तांची घेतली भेट
भाजप नेते रामभाऊ दाभाडे यांची माहिती

पुणे : यशवंत कारखाना तसेच वाघोली येथील नागरिकांच्या समस्यांसह विविध प्रश्नांसंदर्भात भाजपसह ‘यशवंत’चे पदाधिकारी व नागरिकांनी पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांची भेट घेतली. भेटीदरम्यान आयुक्तांसोबत विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.
पीएमआरडीए आयुक्तांसोबत विविध मुद्द्यावर झाली चर्चा करण्यात आली. यामध्ये यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जागेवरील आरक्षण रद्द करणे, नगर रोड व सोलापूर रोड हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या तसेच वाघोली येथील नागिरकांचे प्रश्न, हवेली येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची जमीन गट नं. १, २ व ४१ वर पीएमआरडी पुणे यांनी दि.२ ऑगष्ट २०२१ रोजी विकास आराखड्यामध्ये बस डेपो, शॉपिंग सेंटर, पार्किंग, टुरिस्ट सेन्टर, कल्चर सेन्टर, टाऊन पार्क या स्वरुपातील टाकलेले आरक्षण रद्द करणे,
पुणे-नगर व सोलापूर रोड येथील हॉटेल व्यवसायिकांना वाढीव बांधकामासंदर्भात ज्या नोटिसा आल्या होत्या त्या नोटीस रद्द करून हॉटेल व्यवसायिकांना बांधकाम नियमित करण्यासाठी वेळ देण्यात यावा, पाच वर्षांपासून मंजूर असलेल्या वाघोली पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम पूर्ण करावे, राहू रोड ते तांबेवाडी सिमेंट काँक्रिट रस्ता, वाघोली येथील बायफ रोड ते वडजाई सिमेंट काँक्रिट रस्ता करणे तसेच वाघोलीतील गटार लाईन, अंतर्गत रस्ते सुधारणा करणे आदी विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.
यावेळी माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप, व्हॉइस चेअरमन मोरेश्वर काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, संजय सातव, संचालक राहुल घुले, किशोर उंद्रे, मिलिंद काळभोर, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव, भाजप पुणे जिल्हा सचिव प्रदीप सातव, सचिन मचाले, मनोज जाधवराव उपस्थित होते.