लक्ष्मण हाके यांचे वादग्रस्त विधान
राजपूत (भा) समाज बांधवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; कारवाईची मागणी

वाघोली : राजपूत (भा) समाजा विषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्यावर शासनाने तात्काळ कारवाई अशी मागणी राजपूत (भा) समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
वाशिम येथे गुरूवार (दि. २७ जून २०२४) रोजी लक्ष्मण हाके यांनी माध्यमांमध्ये राजपूत (भामटा) समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामूळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली क्षत्रिय मराठा समाज व क्षत्रिय राजपूत समाजाला टार्गेट करत समाजासमाजात तेढ निर्माण करत आहेत.
समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्रात फिरण्यावर बंदी घालावी तसेच गृह विभागाने योग्य कारवाई करावी अशी मागणी राजपूत समाज बांधवांनी केली आहे.
यावेळी राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष शिवकुमारसिंह बैस, राजपूत समाज सभा पुणे उपाध्यक्ष हेमलता परदेशी, करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विलास कच्छवे यांच्यासह राजपूत समाज बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.