वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. स्मिता कोलते तर सचिवपदी डॉ. अनिता सातव पाटील
संस्थापक डॉ. विनोद सातव पाटील यांची माहिती

वाघोली : वाघोली डॉक्टर्स असोसिएशनची शनिवारी वार्षिक सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पुढील एक वर्षासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
वाघोली डॉक्टर्स असोसिएशनची हॉटेल सीजन्स-२४ मध्ये शनिवारी (२० जुलै) वार्षिक सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुढील एक वर्षांसाठी (२०२४ ते २०२५) डॉक्टरांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती असोसिएशनचे संस्थापक डॉ. विनोद सातव पाटील यांनी दिली.वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी केअर हॉस्पिटलच्या डॉ. स्मिता कोलते, सचिवपदी डॉ. अनिता सातव, कोषपाल डॉ. मयुरा बेहेळे, उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र काशीद, डॉ. विजयकुमार गुट्टे, सहसचिव डॉ. नितीन पवार, सहकोषपाल डॉ, राहुल शिंदे तसेच विविध कमिटीवर डॉक्टरांची निवड करण्यात आली.
सोशियल आणि सांस्कृतिक कमिटी – डॉ. स्वप्निल मरकड, डॉ. ज्ञानेश्वर खरात, डॉ. नीलिमा तेली, डॉ. रश्मी खरात, डॉ. सविता खरात स्पोर्ट्स कमिटी – डॉ. श्रीनिवास मैंदाड, डॉ. चेतन कोलते, डॉ. बाळकृष्ण वाणी, डॉ. रवी धायगुडे मेडीकोलिगल कमिटी – डॉ. रघुनाथ रामकर, डॉ. भूषण विधाते, डॉ. सुनील गुप्ता, डॉ. अभिजीत लांडगे वुमेन्स फोरम – डॉ. अमृता विधाते, डॉ. वर्षा दावणे, डॉ. ज्योती जाधव, डॉ. विजयालक्ष्मी जायभाई स्विकृत सदस्य – डॉ. लक्ष्मीकांत बेहेळे, डॉ. वैशाली जायकर, डॉ. रिद्धी अष्टपुत्रे, डॉ. ज्ञानेश्वर टेमक, डॉ. संदीप कर्चे, डॉ. ज्ञानेश्वर गिरी यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी डॉक्टर्स ‘डे’चे औचित्य साधून सर्व डॉक्टरांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला. असोसिएशनचे हे तेरावे वर्ष असून २५२ सदस्य संख्या आहे. असोसिएशनच्या माध्यमातून वेगवेगळे सिएमई, आरोग्यशिबिरे, डॉक्टर्स डे, स्पोर्ट्स व सांस्कृतिक कार्यक्रम, बोगस डॉक्टरांवर आळा घालणे तसेच सहलीचे आयोजन केले जाते.
नुकतीच वाघोली येथील हॉटेल सीजन्स येथे वाघोली डॉक्टर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभेची बैठक संपन्न झाली. यामध्ये पुढील एक (२०२३ ते २०२४) वर्षांसाठी एकमताने कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. – डॉ. विनोद सातव पाटील (संस्थापक, वाघोली डॉक्टर्स असोसिएशन)