Video : लहान मुलांना सांभाळणारी महिला निघाली अट्टल चोर 

येरवडा पोलीस तपास पथकाची कामगिरी; दोन गुन्हे उघडकीस

येरवडा : उच्चभ्रू कुटुंबात लहान मुलांना सांभाळ करण्याचे काम मिळवून घरातील दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या महिलेस येरवडा पोलीसांनी अटक केली आहे. तिने येरवडा आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरात चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. तिच्याकडून १७ लाख ११ हजार ८०० रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करण्यात आला आहे.

सायली संतोष कार्वे (वय २२ रा. किन्हई जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये  २८ मे २०२४ रोजी  कपाटातून १३ लाख ३६ हजार ८०० रुपये किंमतीचे २६० ग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागिने लहान मुलांचा सांभाळ करणारी महीला चोरी करुन  घेवून गेली  असल्याची तक्रार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याचा येरवडा पोलीस तपास करत असताना  तपास पथकातील पोलीस अंमलदार  तुषार खराडे, किरण घुटे व  सुशांत भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत सदर गुन्हयातील आरोपी ही तिचे मुळ गावी (किन्हई ता. कोरेगाव, जि. सातारा) येथे असलेबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. माहिती वरिष्ठांना देऊन उपनिरिक्षक स्वप्निल पाटिल,  तुषार खराडे, कैलास डुकरे, सुशांत भोसले,  शामलता देवकर यांनी तेथे जावून संशयीत महिलेस ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक  चौकशी करता तिने कल्याणीनगर भागात लहान मुलाचा सांभाळ करणेचे काम मिळवून सदर घरात प्रवेश करुन तेथील घरात चोरी केलेची कबूली दिली. सदर महिलेस अटक केल्या नंतर  पोलीस कस्टडीदरम्यान अधिक तपास करता तिने आंबेगाव परिसरात सुध्दा एका घरात लहान मुलगा सांभाळण्याचे काम मिळवून तेथे सुध्दा चोरी केलेची कबुली दिली. त्यावरुन तपासात  भारती विदयापीठ पोलिस स्टेशन कडील गुन्हा उघडकीस आला आहे. एकूण २ गुन्हे उघडकीस आणून १७ लाख ११ हजार ८०० रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी  अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपआयुक्त  विजयकुमार मगर,  सहा. पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे,  वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या  मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी उपनिरिक्षक स्वप्निल पाटील,  प्रदिप सुर्वे, हवालदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे,  सागर जगदाळे,  अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केली आहे.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button