पहिल्या उपाहार गृहाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून येरवडा कारागृहाच्या दुसऱ्या उपाहार गृहाचे भूमीपूजन

येरवडा : येरवडा खुले जिल्हा कारागृह बंदी संचलित शृंखला उपहारगृह 9 ऑगस्ट 2023 रोजी सुरु करण्यात आले आले. या उपहारगृहाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून बंगला क्र.-9, डॉन बॉस्को हायस्कुल गेट नं. 3 समोर, शास्त्रीनगर, येरवडा याठिकाणी कारागृहाच्या वतीने दुसरे उपाहार गृह सुरू करण्यात येणार आहे. त्याचा भूमीपूजन समारंभ नुकताच अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालींदर सुपेकर, उपमनिरीक्षक स्वाती साठे, दौलतराव जाधव, तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य नितिन वायचळ, येरवडा कारागृहाचे अधिक्षक सुनिल ढमाळ, अधिक्षक अनिल खामकर, वरीष्ठ तुरुंग अधिकारी राजेंद्र मरळे, निशा श्रेयकर तसेच कारागृहाचे इतर अधिकारी व कर्मचारीवृंद उपस्थित होते.
या शृंखला उपहारगृह संकल्पनेची माहिती देऊन बंदयांमध्ये सकारात्मकता वाढावी व त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सुरु करण्यात आहे.
– अभिताभ गुप्ता (अपर पोलीस महासंचालक)