जबरी चोरीतील तीन फरार आरोपी जेरबंद
विश्रांतवाडी पोलीस पथकाची कामगिरी

विश्रांतवाडी : एका बावीस वर्षीय तरुणाची फेसबुकवर ओळख करून सेक्ससाठी मुलगी देतो असे सांगून मोकळ्या जागेत नेऊन फोन पे वरून त्रेचाळीस हजार रुपये काढून मोबाईल घेवून पळून जाणाऱ्या तीन सराईतास विश्रांतवाडी पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफिने जेरबंद केले आहे.
अमन अजीज शेख (वय २२ वर्षे रा. वडगावशेरी), मजर जुबेर खान (वय २४ वर्षे रा. नागपुर चाळ, येरवडा), दिपक शांताराम कांबळे (वय २३ वर्षे रा. जाधवनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल राजेंद्र नलावडे या बावीस वर्षीय तरुणाची फेसबुक तीन इसमांनी ओळख केली. त्यानंतर तरुणाला सेक्ससाठी मुलगी देतो असे सांगून विश्रांतवाडी येथील कस्तुरबा सोसायटीच्या पाठीमागे खदानीजवळ मोकळ्या जागेत घेवून गेले. त्याठिकाणी तरुणाला शिवीगाळ व दमदाटी करून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेवून फोन पे वरून ४३ हजार रुपये काढून घेतले. तसेच मोबाईल घेवून पळून गेले. याप्रकरणी तरुणाने विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला तरुणाच्या ताकारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार विश्रांतवाडी पोलीस तपास पथकाने तांत्रीक माहिती व गुप्त बातमीदाराच्या आधारे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली.
सदरची कारवाई अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ-४ चे पोलीस उप-आयुक्त विजय मगर, सहा. पोलिस आयुक्त आरती बनसोडे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव, पोलिस निरिक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस हवालदार दिपक चव्हाण, यशवंत किर्वे, पोलीस अंमलदार संपत भोसले, संजय बादरे, संदिप देवकाते, प्रफुल मोरे, शेखर खराडे, किशोर भुसारे, अनिल भारमळ, अक्षय चपटे यांनी केली.