वडगावशेरी मतदार संघातून मोहोळांना खराडी-चंदननगर मधून सर्वाधिक मताधिक्य

महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर दोन प्रभागात पुढे

पुणे : (उदय पोवार) लोकसभा निवडणुकीत भाजपचे विजयी उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना वडगांवशेरी मतदार संघातून १ लाख १९ हजार ७३८ इतके मतदान झाले आहे. तर महाविकास आघाडीकडून लढणारे काँगेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना १ लाख ४ हजार ७५३ इतके मतदान झाले आहे. मतदार संघातील एकूण ६ प्रभाग आणि ग्रामीण भाग मिळून प्रभाग क्रमांक चार खराडी-चंदननगर मधून मोहोळ यांना सर्वाधिक ८७४४ चे मताधिक्य मिळाले आहे. तर मुस्लीम आणि दलितांचा प्रभाव असणाऱ्या दोन प्रभागातून धंगेकर यांना अधिक मताधिक्य मिळाले आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून लढणारे कै. गिरीष बापट यांना  १ लाख १७ हजार ६६४ तर काँगेस कडून लढणारे मोहन जोशी यांना ६० हजार ८४३ इतके मतदान झाले होते. त्यावेळी बापट यांना ५६ हजार ८०६ इतके मताधिक्य होते. यावेळी महायुती तसेच महाविकास आघाडी असल्याने लीड कमी राहिले आहे. काँग्रेसचे ४३ हजार ९१० इतके मतदान वाढले आहे. भाजपचे २ हजार ७४ इतके मतदार गेल्यावेळीपेक्षा वाढले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढवणाऱ्यांसाठी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

मोहोळ यांना प्रभाग एक धानोरी-विश्रांतवाडी,  प्रभाग तीन विमाननगर-लोहगाव, प्रभाग चार चंदननगर-खराडी, प्रभाग पाच वडगांवशेरी-कल्याणीनगर तसेच लोहगाव, वडगांव शिंदे, निरगुडी, मांजरी या भागांतून मताधिक्य मिळाले आहे. मात्र प्रभाग दोन नागपूर चाळ-फुलेनगर आणि प्रभाग क्रमांक सहा संपूर्ण येरवडा मधून कमी मताधिक्य मिळाले आहे. माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी नगसेवक अनिल टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक हे रहात असलेल्या भागांतून मताधिक्य मिळाले आहे. मात्र विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे रहात असलेल्या व ते अगोदर नगरसेवक असलेल्या प्रभाग दोन मधून धंगेकर यांना लीड मिळाले आहे. तर वंचित आघाडीचे उमेदवार वंसत मोरे यांना एकुण १० हजार ५० इतके मतदान मतदार संघातून झाले आहे.

वडगांवशेरी मतदार संघातून प्रभाग निहाय झालेले मतदान

प्रभाग-१ (धानोरी-विश्रांतवाडी) – मोहोळ १९४४७, धंगेकर  १४४३७, मोहोळ यांना ५०१० लीड, प्रभाग-२ (नागपूर चाळ-फुलेनगर) – मोहोळ १५९४८, धंगेकर  १८४४४, धंगेकर यांना २४९६ लीड, प्रभाग-३ (विमाननगर-लोहगाव पार्ट), मोहोळ १६३५२, धंगेकर १४२००, मोहोळ यांना २१५२ लीड, प्रभाग-४ (खराडी- चंदननगर) – मोहोळ २१४२९, धंगेकर १२६८५, मोहोळ यांना ८७४४ लीड, प्रभाग-५ (वडगांवशेरी-कल्याणीनगर) – मोहोळ १९६१९, धंगेकर १४६८३, मोहोळ यांना  ४९३६ लीड, प्रभाग-६ (येरवडा) – मोहोळ ११०९३, धंगेकर २०१३२, धंगेकर यांना ९०३९ लीड, (लोहगाव, वडगाव शिंदे, निरगुडी, मांजरी) मोहोळ १५८५०, धंगेकर १०१७२, मोहोळ यांना ५६७८ लीड.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button