राहूल गांधी यांचेवर गून्हा दाखल करा
भारतीय जनता युवा मोर्चाची लोणीकंद पोलिस स्टेशनला निवेदनाद्वारे मागणी

पुणे : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी मध्ये जन्माला आलेले नसल्याचा दावा केला आहे. समस्त ओबीसी समाजाचा अपमान करणारे हे विधान असून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या विधानाचा निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांचेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने लोणीकंद पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदिप सातव, प्रदेश उपाध्यक्ष गणेश (बापू) कुटे, भाजपा जिल्हा सचिव प्रदिप सातव, सरचिटणीस गौरव झुरुंगे, उपाध्यक्ष उमेश मोरे, प्रवीण फडतरे, राहुल कुटे, सचिव विलास सातव, हवेली तालुका अध्यक्ष दत्ता आबा हरगुडे, मिनार जगताप व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.