वाघोलीकरांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार

पीएमआरडीएची पाणीपुरवठा योजना एप्रिल अखेर होणार पूर्ण; आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांच्या प्रयत्नांमुळे पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामाला गती

वाघोलीवाघोली, आव्हाळवाडी पाणीपुरवठा प्रकल्प लवकरच सुरु होणार असून सदरील योजनेसाठी बावीस कोटी रुपये मंजूर आहेत. गेली सहा वर्षांपासून कासव गतीने सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची नुकतीच स्थानिक लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांनी पाहणी केली. एप्रिल महिन्या अखेर प्रकल्प सुरु होणार असल्याची माहिती आमदार कटके यांनी दिली. पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरच सुरु होणार असल्याने वाघोलीकरांची पाण्यासाठी करावी लागणारी वणवण भटकंती थांबणार आहे. 

शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोलीसह मतदार संघात वाहतूक कोंडी, रस्ते, कचरा, लाईट, ड्रेनेज आदी मुलभूत समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे विकास कामांना गती मिळाली आहे. विशेषतः गेल्या ६ वर्षांपासून मागील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे प्रतीक्षेत असलेला पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न देखील सातत्याने प्रयत्न करून आमदार कटके यांनी मार्गी लावला. योजनेच्या उर्वरित कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याने नागरिकांना प्रचंड उन्हात करावी लागणारी वणवण भटकंती थांबणार आहे. वाघोली व आव्हाळवाडीकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी व ठेकेदाराच्या समावेत नुकतीच आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांनी पाणीपुरवठा योजनेच्या प्रकल्पाची पाहणी करून लवकर उर्वरित काम सुरु करण्याची सूचना केली आहेत. 

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कटके, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव, भाजप पुणे शहर चिटणीस केतन (भैय्या) जाधव, युवासेना पुणे जिल्हा प्रमुख मच्छिंद्र सातव पाटील, भाजप युवा मोर्चा माजी हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील, ठेकेदार आदी उपस्थित होते.

स्व. बाबुराव पाचर्णे, तत्कालीन पालकमंत्री स्व. गिरीश बापट यांच्या माध्यमातून २०१९ मंजूर झाले होती. परंतु मागील लोकप्रतिनिधी व संबधित पीएमआरडीएचे संबधित अधिकारी यांचे उदासीनतेमुळे नागरिकांना पाणी उशिरा मिळत आहे. मात्र आता लवकरच नागरिकांना पाणी टंचाईपासून मुक्ती मिळणार आहे.

– रामभाऊ दाभाडे  (माजी जिल्हा परिषद सदस्य, वाघोली)

वाघोली, आव्हाळवाडी पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच मार्गी लागणार आहे. त्यामुळे वाघोलीसह आव्हाळवाडीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दरवर्षी नागरिकांना पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे.

– गणेश बापू कुटे  (प्रदेश उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा)

स्व. आमदार बाबुराव पाचर्णे आणि शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २०१९ साली पीएमआरडीएकडून २२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती. परंतु या योजनेचे काम संथ गतीने चालू होते. मात्र आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांनी अधिकारी व ठेकेदार यांच्या बैठका घेवून काम लवकरच पूर्णत्वास नेण्यासाठी कामाच्या सद्यस्थितीची पाहणी केली आणि अधिकारी व ठेकेदार यांना लवकरच काम सुरु करणेबाबत सूचना केली. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच वाघोलीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

– संदीप सातव  (जिल्हाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, पुणे)

पीएमआरडीएची वाघोली, आव्हाळवाडी पाणीपुरवठा योजना २०१९ साली मंजूर झाली होती. गेली पाच वर्षांपासून नागरिकांना या योजनेची प्रतीक्षा करावी लागली आहे. परंतु आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांनी पाणी समस्या सोडवण्यासाठी मोठे पाउल उचले असून काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे नागरिकांची प्रतीक्षा संपणार असून एप्रिल २०२५ अखेर प्रकल्प पूर्ण होऊन नागरिकांना पाणी समस्येतून दिलासा मिळणार आहे.

– अनिल सातव पाटील  (भाजप युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष)

वाघोली व आव्हाळवाडी या दोन्ही गावात पुरवठा करण्यासाठी पीएमआरडीए पुणे अंतर्गत १९ सप्टेंबर २०१९ रोजी इंटेक वेल प्रकल्प मंजूर झाला. कामाची वर्क ऑर्डर निघाली आणि काम सुरु झाले. परंतु जे काम तीन वर्षात पूर्ण होणार होते ते काम माजी आमदार यांनी लक्ष न दिल्याने रखडले होते. मात्र आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांच्या प्रयत्नांमुळे कामाला गती मिळाली असून येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे.

– मच्छिंद्र सातव पाटील  (युवासेना जिल्हा प्रमुख, पुणे)

शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोलीसह मतदार संघात वाहतूक कोंडी, रस्ते, कचरा, लाईट, ड्रेनेज आदी मुलभूत समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे विकास कामांना गती मिळाली आहे. विशेषतः नागरिकांच्या जिव्हाळ्याचा पाणीपुरवठा योजनेचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष घातल्याने पाणी टंचाई पासून सुटका मिळणार आहे.

– संदीप आप्पा जाधव  (सामाजिक कार्यकर्ते, वाघोली)

आमदार माऊली आबा कटके यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या सहा वर्षापासून प्रलंबित असलेली पीएमआरडीएची २२ कोटी रुपयांची वाघोली पाणी पुरवठा योजनेचे जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाल आहे. लवकरच वाघोली, बकोरी रोड, आव्हाळवाडी परिसरातील नागरिकांना मिळणार हक्काचे पाणी मिळणार असल्याने नागरिकांची लाखो रुपयांची बचत होणार आहे.

– कल्पेश जाचक  (श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान, वाघोली)

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button