४५६ गहाळ मोबाईलचा शोध लावण्यात पोलिसांना यश

आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तक्रारदार नागरिकांना मोबाईल परत  

वाघोलीपुणे पोलिसांनी गहाळ झालेल्या व हरविलेल्या तब्बल ४५६ मोबाइल्स परत मिळवून ते तक्रारधारकांच्या हवाली केले. पोलिसांनी सीईआयआर पोर्टलच्या मदतीने हे मोबाईल ट्रेस करून परत मिळविले आहेत.

नागरिकांचे हरवलेले गहाळ झालेले मोबाईल फोनच्या तक्रारी करण्याकरता पुणे शहर पोलीस वेबसाईटवर लॉस्ट अँड फाउंड हे पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले होते. नागरिकांकडून पोर्टलवर मोठ्या प्रमाणावर मोबाईल हरवल्याच्या तक्रारी येत असतात. या तक्रारीच्या अनुषंगाने नागरिकांना प्रॉपर्टी मिक्सिंगचा दाखला ऑनलाईन मिळतो. हरवलेल्या मोबाईलच्या आयएमईआय क्रमांकाचे तांत्रिकी विश्लेषण करून हरवलेल्या मोबाईलमध्ये सध्या सुरू असलेल्या सिम कार्डचा मोबाईल क्रमांकाचा शोध घेवून महिन्याभरात केलेल्या कारवाईत पोलिसांना २ हजार ३०० मोबाईल पैकी ४५६ मोबाईलचा शोध लावण्यात यश आले आहे.

शुक्रवारी (दि. १४ फेब्रुवारी) पोलीस मुख्यालयातील हिरकणी हॉल येथे मोबाईल परत करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करून पडलेले मोबाईल तक्रारदार नागरिकांना परत करण्यात आले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, आर्थिक व सायबर गुन्ह्याचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, राहुल शिंदे, किरण जमदाड, संदीप कोळगे, प्रमोद टिळेकर, विशाल इथापे, मनोज सांगळे, चेतन चव्हाण, नितीन जगदाहे, राजेंद्र पुणेकर, लटू सूर्यवंशी, समीर पिलाने, ईश्वर आंधळे, सुनयना मोरे, लोकेश्वरी चुटके, किरण गायकवाड, सचिन शिंदे, कल्याणी कोळेकर, सुषमा तरंगे, दिनेश मरकड, अमर बनसोडे, आदनान शेख अशा सहा टीमने मोबाईल परत मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button