वाघोली-आव्हाळवाडी रोडवरील बजरंग नगर परिसरातील ड्रेनेज लाईनच्या कामाला वेग
संदीप सातव यांच्या पाठपुराव्यामुळे ड्रेनेजचा प्रश्न मार्गी

वाघोली : वाघोली-आव्हाळवाडी रोडवरील बजरंग नगर परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज समस्येला सामोरे जावे लागत होते. भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांनी गांभीर्याने समस्येची दखल घेत सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर ड्रेनेज लाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे. काम सुरु झाल्याने बजरंग नगर येथील रहिवाशांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
ड्रेनेज लाईनमुळे बजरंग नगर परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार असून, स्वच्छतेच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. प्रशासनाच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामासाठी सहकार्य केले असून, स्थानिक रहिवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांनी सांगितले.