घोड व चासकमान प्रकल्पांच्या सुधारणेला मिळणार गती

आमदार कटके यांनी घेतली कृष्णा खोरे  वि.म. चे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांची भेट; लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळणार अधिकाधिक फायदा

पुणे घोड व चासकमान प्रकल्पांच्या सुधारणा, देखभाल व दुरुस्ती करणेबाबत आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यात बैठक झाली. बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. घोड आणि चासकमान प्रकल्पांच्या सुधारणा व देखभाल कार्यात गती येणार आहे. लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळणार असल्याचे शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सांगीतले.

घोड प्रकल्प १९६० साली पूर्ण असून त्याला ६० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. गाळ सर्वेक्षण अहवालानुसार धरणात सुमारे १ टीएमसी गाळ साठलेला आहे. त्यामुळे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी हा गाळ काढण्याची मागणी आमदारानी केली. शासन स्तरावर याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे कार्यकारी संचालकांनी सांगितले.

कालव्यांची दुरुस्ती करावी 

घोड प्रकल्पाच्या कालव्यांची सध्या दुरावस्था झाल्याने त्याच्या दुरुस्तीची गरज असल्याचे आमदारांनी नमूद केले. यावर महाराष्ट्र सिंचन सुधार प्रकल्पांतर्गत 76 कोटी रुपये मंजूर झाले असून, काही महिन्यांतच कालव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याचे कार्यकारी संचालकांनी सांगितले. घोड नदीवरील कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्यांची गळती दुरुस्ती करा  अशासूचना आमदारांनी केल्या.   आवश्यक लोखंडी बर्गे देण्यात येतील आणि दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे कार्यकारी संचालकांनी सांगितले.

कालव्यातील गाळ काढून पाणी वाहतुकीची क्षमता वाढविण्याची सूचना केल्यानंतर यांत्रिकी विभागाच्या यंत्र सामग्रीद्वारे हे काम हाती घेतले जाईल, असे कार्यकारी संचालकांनी सांगितले.

शेवटच्या टप्प्याचे अस्तरीकरण 

डिंभे धरणाचा उजवा कालवा ११३ किमी लांबीचा असून, त्यातील शेवटच्या १२-१३ किमी लांबीत अस्तरीकरण नाही. त्यामुळे कालवा पूर्ण क्षमतेने चालू शकत नसल्याचे आमदारांनी निर्दशनास आणून दिल्यानंतर कार्यकारी संचालकांनी सांगितले की, या कालव्याच्या शेवटच्या भागाच्या काँक्रीट अस्तरीकरणासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला असून, लवकरच त्यास मंजुरी मिळेल. कालवा फोडनाऱ्यांवर कारवाई करा :

घोड व डिंभे उजव्या कालव्यांच्या आवर्तना दरम्यान होणारा अनधिकृत पाणी उपसा तसेच कालवा फोडण्याचे प्रकार वाढले आहेत. कालवा फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार कटके यांनी केली. यावर कार्यकारी संचालकांनी क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत सक्त सूचना देण्यात येतील असे सांगितले.

१४ वर्षांनंतर सुप्रमा मंजूर

चासकमान प्रकल्पाच्या अस्तरीकरणाच्या कामासाठी १४ वर्षांनंतर सुप्रमा मंजूर करण्यात आली आहे. 0-७२ ते ७२-१४६ किमी अस्तरीकरण मंजुरी प्रक्रियेत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत 0-७२ ते ७२-१४६ किमी अस्तरीकरण कामास मंजुरी मिळणार आहे. के.डी. ब्रँच कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम मंजूर झाले असून, निविदा प्रक्रिया तातडीने सुरू होईल. शासनाने घेतलेल्या जमिनींच्या मोबदल्यासाठी भूभाडे देण्याची मंजुरी प्रक्रिया सुरू आहे. कालव्यातील गळती रोखण्यासाठी अस्तरीकरण व स्ट्रक्चरल कामांना प्राधान्याने सुरुवात केली जाईल. पुढील आवर्तन टेल टू हेड पद्धतीने चालवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी आवश्यक प्रशासकीय यंत्रणा आणि साधनसामग्री पुरवली जाणार आहे. न्हावरे, निर्वी आणि निमोणे शाखांसाठी स्वतंत्र कार्यालये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. घोड आणि चासकमान प्रकल्पांच्या सुधारणा व देखभाल महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे घोड आणि चासकमान प्रकल्पांच्या सुधारणा व देखभाल कार्यात गती येणार आहे. त्यामुळे  लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळणार आहे.

ज्ञानेश्वर आबा कटके  (आमदार, शिरूर-हवेली)  

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button