सराईताकडून देशी बनावटीचे पिस्तुल हस्तगत
गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाची कामगिरी; मोक्का गुन्ह्यात जामिनावर झाला होता मुक्त

पुणे : मोक्का गुन्ह्यामध्ये जामिनावर मुक्त असलेल्या सराईत सराईताकडून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने हस्तगत केले आहे.
अनिकेत गुलाब यादव (वय २२ रा. सोपान नगर, कदमवाक वस्ती, लोणीकाळभोर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हे शाखा युनिट-६ हद्दीत गस्तीवर असताना पोलीस हवालदार बाळासाहेब सकटे यांना लोणी काळभोर येथील कदम वाक वस्ती परिसरातील सोपान नगर येथे अभिलेखावरील मोक्का गुन्ह्यामध्ये जामिनावर असलेला सराईताकडे देशी पिस्तुल असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमिदारामार्फात मिळाली. त्यानुसार युनिट-६ च्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पोलिसांना त्याचेकडे एक देशी बनावटीचा पिस्तुल व एक जिवंत काडतूस मिळून आले.
त्याचेविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
सदरची कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, पो.हवा. सुहास तांबेकर, महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.