पुणे महापालिकेचे बजेट मार्चमध्ये

भरीव तरतूद असेल का, याकडे समाविष्ट गावातील नागरिकांचे लक्ष

वाघोलीमहापालिका आयुक्तांकडून दरवर्षी १५ जानेवारीपूर्वी पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीत सादर केले जाते. मात्र, यंदा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अंदाजपत्रक सलग चौथ्या वर्षी मार्चमध्ये सादर होणार आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट गावांतील नागरी सुविधांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. या गावांतील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा आदी कामे मोठ्या प्रमाणावर करावी लागणार आहेत. त्यासाठी भरीव तरतूद २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात असेल का, याकडे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या विविध भांडवली कामे, वॉर्डस्तरीय कामे, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आदींबरोबरच वेतन खर्च आदी तसेच उत्पन्न आदीचा ताळमेळ घालणारे हे अंदाजपत्रक हे शहराच्या विकासाची दिशा दाखविणारे असते. लोकप्रतिनिधी असताना, प्रथम महापालिका प्रशासक (आयुक्त) हे अंदाजपत्रक तयार करून ते स्थायी समितीला सादर करतात. स्थायी समितीमध्ये या अंदाजपत्रकावर चर्चा होऊन आणखी तरतुदी केल्या जातात. यामध्ये वॉर्डस्तरीय कामांचा समावेश असतो. तसेच सत्ताधारी पक्षाच्या धोरणाचे प्रतिबिंबही या अंदाजपत्रकात पडत असते. महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून प्रशासक म्हणून आयुक्त काम पाहात आहेत. पहिले तीन वर्ष तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी अंदाजपत्रक सादर केले. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले अर्थसंकल्प कधी सादर करणार याकडे लक्ष लागले आहे.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button