हिट अँड रन प्रकरणी येरवड्यातील दोन पोलीस अधिकारी निलंबित

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका

येरवडा : पुणे कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित करण्याचा निर्णय पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेला आहे. प्रत्यक्षदर्शी म्हणून घटनास्थळी पोहचलेल्या दोन पोलिसांनी ही माहिती कंट्रोल रुमला न कळवल्याने अपघाताची माहिती रात्री ऑन ड्युटी असलेले डीसीपी संदीप गिल यांच्याकडे पोहोचली नव्हती. या कृत्यामुळे पुणे पोलिसांच्या तपासावर देखील संशय व्यक्त केला जात होता.

 

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button