उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

वाघोली : भाजप वाघोली शहरच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस (दि. २२ जुलै) विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त वाघोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच भावडी रोडवरील सोसायटीमध्ये वृक्षारोपण करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती भाजप वाघोली शहर अध्यक्ष केतन (भाऊ) जाधव यांनी दिली.
यावेळी भाजप युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधवराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. नागसेन लोखंडे, भाजप वाघोली शहर उपाध्यक्ष हरीश वाळूंज, सुरेश जगताप, भाजप मीडिया वाघोली शहर अध्यक्ष दत्तात्रय झोरे, राहुल वराळ, धीरज आगरकर, शैलेश शिंदे, जयेश मुत्यलकर, युवराज मालपूरे, मंगेश पोहरे, योगेश माळी, विकी होरा, प्रतिक उपाध्याय, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, सोसायटीचे सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.