राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ३२ बार वर कारवाई

१४ पथकांमार्फत राबविण्यात येत आहे मोहिम; १ कोटी १२ लाखांचा दंड वसूल

पुणे : कल्याणीनगर येथील अपघाताच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून धडक मोहिम राबविण्यात आलेली असून आतापर्यंत विविध ३२ परवाना कक्ष अनुज्ञप्ती बंद करण्यात आलेल्या आहेत. अनुद्यप्ती विहीत वेळेनंतर सुरु  ठेवल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांनी  दिली.

राज्य् उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच  विभागीय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त यांच्या  मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हयात धडक मोहिम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांना मद्यविक्री करणे, विहीत वेळेनंतरही अनुज्ञप्तीचे व्यवहार चालू ठेवणे, अनाधिकृत ठिकाणी (रुफटॉप) मद्य वितरीत करणे, अवैध मद्यसाठा ठेवणे आदी नियमांचे उलंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

मागील तीन दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एकुण १४ पथकांमार्फत मोहिम राबविण्यात येत आहे. या कारवाईत एकूण ३२ परवाना कक्ष अनुज्ञप्तींवर विविध कारणांसाठी विभागीय गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामध्ये १० रूफटॉप, सुमारे १६ पब, इतर ६ परवाना कक्ष बार वर कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सर्व ३२ अनुज्ञप्तींचे व्यवहार तात्काळ  बंद ठेवण्याचे आदेश दिले असून  सर्व अनुज्ञप्ती सील करण्यात आलेल्या आहेत.

वारंवार अनुज्ञप्तींच्या गैरव्यवहाराबाबत कारवाई करण्यात येते. कोझी बारवर केलेल्या कारवाईबद्दल अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद केल्याची कारवाई केलेली असली तरी दोन महिन्यांपूर्वी या विभागाने विभागीय गुन्हा नोंद केलेला आहे. सन २०२३-२४ मध्ये राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून एकुण २९७ अनुज्ञप्तीवर विविध कारणांसाठी गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये १ कोटी १२ लाख रुपये रक्कमेचा दंड वसुल करण्यात आलेला आहे. तसेच १७ अनुज्ञप्तींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर २ अनुज्ञत्या कायमस्वरुपी चंद करण्यात आल्या आहेत. एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत ५४ अनुज्ञप्त्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले असून   ५ लाख रूपये इतका दंड वसुल केलेला आहे तर एकुण ३२ अनुज्ञप्त्या सील करण्यात आलेल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग नियोजनबद्ध कारवाई करित असून अनुज्ञप्ती विहीत वेळेनंतर सुरू ठेवणे, अल्पवयीन मुलांना मद्यविक्री न करणे, अवैध ठिकाणांवर (रुफटॉपवर) मद्यविक्री न करणे या बावत सर्व पथकांकडून तपासणी मोहिम चालू असल्याची माहिती उपायुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे.

 गैरव्यवहाराबाबत करता येणार तक्रार 

उत्पादन शुल्क विभागाकडे मद्यसेवन परवाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असून ऑनलाईन पध्दतीनेही exciseservices.mahaonline.gov.in या संकेत स्थळावरून देखील मद्यपरवाने देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच वरील गैरव्यवहारासंदर्भात जनतेच्या तक्रारी असल्यास टोल फ्री नं. १८००२३३९९९९ किंवा व्हॉटस क्रमांक ८४२२००११३३ या क्रमांकावर तक्रार देण्याचे आवाहन उत्पादन शुल्क आयुक्तांनी  केले आहे.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button