वाघोली, खराडीतील होर्डिंगवर महापालिका चढवणार बोजा

होर्डिंग कारवाईचा खर्च केला जाणार वसूल  

पुणे :  वाघोलीतील सहा व खराडीतील पाच जाहिरात फलकांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात करण्यात आली होती. कारवाई केल्यानंतर कारवाईचा खर्च वसूल करण्यासाठी संबधित अकरा जाहिरातदारांच्या मिळकतींवर बोजा चढवून महापालिकेकडून खर्च वसूल केला जाणार आहे.

परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून अनधिकृत जाहिरात फलक निष्कासन कारवाई झाल्यानंतर सदरचा कारवाई खर्च संबंधित अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या संस्था/व्यक्तीकडून वसूल केला जातो. सदरचा निष्कासन कारवाई खर्च जाहिरात फलक लावणाऱ्या संस्था/व्यक्तीने विहित मुदतीत न भरल्यास कारवाईचा खर्च संबंधित जाहिरात फलक अभिकरणाकडून वसूल करण्याची तरतूद करण्यात आलेलीआहे. वसुली करण्याचे अधिकार महापालिका आयुक्त यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.

त्याअनुषंगाने नगर रोड क्षेत्रिय कार्यालय कार्यक्षेत्रात असणारे खराडी, वाघोली भागातील ११ जागा मालकांच्या खाली दिलेल्या यादीप्रमाणे ११ जाहिरात फलकाचा एकूण शुल्क रक्कम १ कोटी ३ लाख १८ हजार इतका भरणा संबंधित जाहिरातदार यांनी केलेला नाही. त्यामुळे संबधित जाहिरातदारांच्या मिळकतीवर बोजा चढवून रक्कम वसूल केली जाणार आहे.

यामध्ये राजू तामगोले (खराडी), संतोष दरेकर (खराडी), सागर बोराटे/विशाल बोराटे (खराडी), रामदास पठारे (खराडी), लक्ष्मण पठारे/शेखर मते (खराडी), पूजा समीर भाडळे (वाघोली) यांचेकडून प्रत्येकी ९ लाख ३८ हजार तर, संपत गाडे/मनीषा गाडे (वाघोली) यांचे दोन मिळकत प्रमाणे नुसार १८ लाख ७६ हजार तर महेंद्र परशुराम भाडळे याचे तीन मिळकत नुसार २८ लाख १४ हजार अशी एकूण १ कोटी ३ लाख १८ हजार रक्कम वसूल केली जाणार आहे.

त्याबरोबर खराडी येथील मे. क्रिशिव पब्लिसिटी तर्फे कौशिक सुनील दत्त यांचे ४ जाहिरात फलकाचा शुल्क १ कोटी २० लाख ६५ हजार ६६ रुपये रक्कमेचा भरणा संबंधित जाहिरातदार यांनी केलेला नसल्याने संबधितांच्या मिळकतीवर बोजा चढवून वसूल केला जाणार आहे.

महापालिकेकडून मिळकतीवर बोजा चढवणे सुरु केले आहे. होर्डिंग व्यावसायिकांनी थकीत शुल्क वेळेत भरावे. – सोमनाथ बनकर (सहा. आयुक्त, वडगावशेरी नगररोड क्षेत्रीय कार्यालय)  

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button