नदीवरील पुलासाठी २५ कोटींचा निधी

शिवसेना हवेली तालुका प्रमुख विपुल शितोळे यांची माहिती; माजी खासदार आढळराव यांचे ढोल ताशात स्वागत; हिंगणगाव-खामगाव टेक नदीवर पुलाचा मार्ग मोकळा

पुणे :  नदीवर पुल करण्यात यावा यासाठी अनेक वर्षांपासून हिंगणगाव, खामगाव टेक, शिंदेवाडी, न्हावी सांडस, सांगवी सांडस येथील ग्रामस्थांची मागणी होती. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेवून माजी खा. शिवाजी आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री यांचेकडे आग्रहाची मागणी केल्यामुळे पंचवीस कोटी रुपये मंजुर झाले असल्याची माहिती शिवसेना हवेली तालुका प्रमुख विपुल शितोळे यांनी दिली आहे.

खामगाव टेक, हिंगणगाव, शिंदेवाडीसह परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे पाठपुरवा करून हिंगणगाव-खामगाव टेक या पुलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी आग्रहाची मागणी लावून धरली होती. माजी खासदार आढळराव पाटील यांची मागणी मुख्यमंत्री यांनी मान्य करून तातडीने २५ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. त्याचबरोबर भावडी-तुळापुर रस्त्यासाठी १० कोटी तर सामाजिक विभागातून ११ गावांसाठी १ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे. संबधित विभागाला मुख्यमंत्र्यांच्या सूचना मिळताच पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली व याबाबतचा अहवाल शासन दरबारी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे हिंगणगाव-खामगाव टेक पुलाचा व रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

माजी खासदार आढळराव पाटील यांच्या माध्यमातून निधी मिळाल्याबद्दल पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्या वतीने आढळराव पाटील व अधिकार्‍यांचे मोठ्या ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार आढळराव पाटील यांचेसह अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध कामांसाठी ३५ कोटींच्या वर निधी दिल्याबद्दल उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अशोक भालकर, कार्यकारी अभियंता विजय कांडगावे, शिवसेना हवेली तालुका प्रमुख  विपुल शितोळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, कृती समितीचे अध्यक्ष अंकुश कोतवाल माजी सरपंच कुंडलिक थोरात, सांगवीचे सरपंच विकास तळेकर, संतोष शिवले, टिळेकरवाडीचे सदस्य सुभाष टिळेकर, खामगाव टेकचे सरपंच मारूती थोरात, मिरवडीचे सरपंच सागर शेलार, शिंदेवाडीचे सरपंच संदिप जगताप, भवरापुरचे सरपंच सचिन सातव,माऊली थोरात, निलेश काळभोर, गणेश सातव, शामराव माने यांचेसह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button