काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन
भाजपा महिला मोर्चा आक्रमक

विश्रांतवाडी : काळा पैसा लपवून ठेवणाऱ्या काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या विरोधात विश्रांतवाडीतील मुकुंदराव आंबेडकर चौकात त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. गोर गरीबांचा काळा पैसा लपवून ठेवणाऱ्या खासदार साहू यांचा निषेध केला.
यावेळी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा माजी नगरसेविका रेखाताई चंद्रकांत टिंगरे म्हणाल्या की , कॉंग्रेस पक्षाचे नेते हे फक्त जनतेचा पैसा लुटून स्वतःची घरे भरण्यासाठी काम करतात. गोरगरीब जनतेचा पैसा गोळा करून ते देशाला लुटत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे. आज कॉंग्रसचे नेते देशवासीयाची करीत असलेली लूट जनतेसमोर आणण्यासाठी आज पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे नेते जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजप महिला मोचाच्या मार्गदर्शना खाली हे जोडे मारा आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी उपस्थित सर्व महिला कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस विरोधी घोषणानी परिसर दुमदुमून सोडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपला कॉंग्रेस विरोधातील रोष प्रकट केला. देशाला प्रगतीकडे नेण्याऐवजी कॉंग्रेस पक्ष देशाला अधोगतीकडे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पुणे शहर भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा कविता मुडेकर , आरतीताई साठे, प्रितीताई काकडे, पूजा टिळेकर , शरयु परब, शामा जाधव, उज्वला गौड, रितू नाईक, प्रगती अकिम, उज्ज्वला गौड , पुणे शहर भाजपा महिला अध्यक्षा हर्षदाताई फरांदे, अश्विनी भाडळे, सविता कदम तसेच भाजप वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ योजना प्रमुख अतुल वैराट, ज्येष्ठ नेते चंद्रकांत जंजीरे आदि मान्यवर उपस्थित होते . कार्यकमाचे सुत्रसंचालन चंद्रकांतदादा टिगरे यांनी केले.