दरडग्रस्त भागात उपाययोजना करा  

जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांची मागणी

 

आमदार अतुल बेनके

पुणे : आमदार अतुल बेनके यांनी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुन्नर तालुक्यातील खामगाव (मांगणेवाडी), निमगिरी (तळमाची वाडी) भिवाडे खुर्द, उंडेखडक, कोटमवाडी, तळेरान आदी भागात भूस्खलन झाले आहेत. या ठिकाणी लोकवस्ती आहे. या भागात मोठ्याप्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने वारंवार डोंगराचा काही भाग वाहून खाली रस्त्यावर येत आहे अनेक ठिकाणी लोक वस्तीकडे जाणारे रस्ते अतिवृष्टी पावसाने खराब झालेले आहेत.

कोटमवाडी (शेळके वस्ती) उंडेखडक (रावते वस्ती) तळेरान (कळमदरी) आदी लोकवस्ती यांना अतिदृष्टी पावसाचा मोठ्याप्रमाणावर फटका बसला आहे. डोंगर भागाचा धोका या लोकवस्त्यांना मोठ्याप्रमाणावर दरवर्षी होत आहे. पाऊस सुरू झाला की या लोकवस्ती मधील लोक मुठीत जीव धरून जीवन जगत असतात. त्यादृष्टीने या नागरिकांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. तर काही ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे निमगिरी (तळमाची वाडी) खामगाव (मांगणेवाडी), भिवाडे खुर्द आधी परिसरात डोंगराच्या भागाला अतिवृष्टी पावसाने मोठमोठ्या भेगा पडत आहे व त्यातून झिरपणारे पाणी यामुळे भुस्खलन स्थिती निर्माण झाली आहे. डोंगराच्या जवळपास लोकवस्ती असल्याने नागरिकांचे कायम स्वरुपी पुनर्वसन होणे गरजेचे आहे. स्थानिक नागरिक व पदाधिकारी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही आज अखेर यावर काहीही कार्यवाही झालेली नाही.

जुन्नर तालुक्यातील खामगाव (मांगणेवाडी) निमगिरी (तळमाची वाडी), भिवाडे खुर्द, तळेरान (कळमदरी), उंडेखडक (रावते वस्ती) कोटमवाडी (शेळके वस्ती) या लोक वस्त्या ह्या डोंगराच्या जवळपास असल्याने या लोकवस्त्यांचे स्थलांतर, पुनर्वसन व लोक उपयोगी उपयोजना होण्यासाठी शासन स्तरावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे.

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button