वाघोली डॉक्टर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी डॉ. भूषण विधाते तर सचिवपदी डॉ. मच्छिंद्र काशीद

वाघोली :  नुकतीच वाघोली येथील हॉटेल सीजन्स येथे वाघोली डॉक्टर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभेची बैठक संपन्न झाली. यामध्ये पुढील एक (२०२३ ते २०२४) वर्षांसाठी एकमताने कार्यकारणी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती वाघोली असोसिएशनचे संस्थापक डॉ. विनोद सातव पाटील यांनी दिली.

वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी केअर हॉस्पिटलचे डॉ. भूषण विधाते, सचिवपदी डॉ. मच्छिंद्र काशिद, कोषपाल डॉ. नितीन पवार, उपाध्यक्ष डॉ. बंडू कराळे आणि डॉ. हेमंत विभुते, सहसचिव डॉ. अतुल जाधव, सहकोषपाल डॉ. राहुल शिंदे तसेच विविध कमिटीवर डॉक्टरांची निवड करण्यात आली.

सोशियल आणि सांस्कृतिक कमिटी – डॉ. चेतन कोलते, डॉ लक्ष्मीकांत बेहेळे, डॉ. पल्लवी मेहेरे, डॉ. वैशाली जायकर, डॉ. सायली भुजबळ स्पोर्ट्स कमिटी – डॉ. ज्ञानेश्वर खरात, डॉ विजयकुमार गुट्टे, डॉ. कपिल जुमले, डॉ प्रवीण काकडे मेडीको लिगल कमिटी – डॉ. रघुनाथ रामकर, डॉ. शंकर वावरे, डॉ. चेतन जायकर, डॉ. दीपक नरनवरे वुमेन्स फोरम – डॉ. दाफिया चिंचाणीकर, डॉ. घनश्री शिंदे, डॉ. रुचा कोलते, डॉ. ज्योती जाधव यांची निवड करण्यात आली.

असोसिएशनचे हे बारावे वर्ष असून २२३ सदस्य संख्या आहे. असोसिएशनच्या माध्यमातून सिएमई, आरोग्य शिबिरे, डॉक्टर्स डे, स्पोर्ट्स व सांस्कृतिक आदी सामाजिक उपक्रम राबविले जातात.

– डॉ. मच्छिंद्र काशीद  (सचिव, वाघोली डॉक्टर्स असोसिएशन)

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button