वाघोलीत पोलिसांनी पकडला ५ किलो पेक्षा अधिक गांजा
तरुणावर लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल
वाघोली : वाघोली येथे डोमखेल रोड कमानीजवळ ५ किलो ४४० ग्रॅम गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली असून त्याच्यावर एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून गांजा, मोबाईल असा १ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
अभिषेक गोरख पवार (वय २०, रा. लोणीकंद) असे गांजा बेकायदेशीररित्या विक्रीकरिता बाळगणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक २ व लोणीकंद पोलिसांनी संयुक्तिक सदरची कारवाई केली आहे.