सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात

वाघोली : वाघोली येथे महापालिका आरोग्य विभागात काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा  ऐरणीवर आली आहे. कामगार कुठल्याही सुरक्षेविना काम करत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तात्काळ कामगारांना सुरक्षेचे साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर गोरे यांनी केली आहे.

वाघोली येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. मास्क, हँडग्लोज, गमबूट न वापरता ड्रेनेजच्या साफसफाईचे काम करत आहेत. कचरा संकलन, सफाईचे काम करताना सुरक्षा साधने नसतील तर कामगारांना श्वसनविकार, फुप्फुसाचे विकार जडू शकतात. पावसाळ्यात कचऱ्यात जिवाणूंचे प्रमाण अधिक असते. नाका-तोंडावाटे ते शरीरात गेल्यास संसर्ग होऊ शकतो. तसेच हँडग्लोजशिवाय कचरा संकलन केल्यास त्वचाविकार सुद्धा होऊ शकतो.

बऱ्याचदा काम करताना कडक प्लास्टिक, लोखंडी वस्तूंचे तुकडे, काचांचे तुकडे यामुळे इजा होऊ शकते. यापूर्वी सुद्धा कामगारांना अशा धोकादायक वस्तूमुळे हानी पोहचली आहे. एकंदरीतच मनपाच्या दुर्लक्षामुळे सफाई कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेणे आमची सुद्धा जबाबदारी आहे. पूर्वी स्टोअरकडून सेप्टीचे साहित्य मिळत होते. परंतु आता ते बंद करण्यात आले आहे. कामगारांना पगारीतच दोन वर्षांतून एकदा साहित्य घेण्यासाठी पैसे देण्यात येतात. त्यांनी यांचे साहित्य घेवून स्व:ताची काळजी घेणे गरजेचे आहे.

– अनिल ढमाले (वरिष्ठ आरोग्य निरीक्षक) 

 

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कामगार सुरक्षेच्या साधना अभावी जीव धोक्यात घालून गटार साफ करण्याचे काम करतात. परंतु त्यांच्या सुरक्षेबाबत मनपाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. तात्काळ कामगारांना साहित्य उपलब्ध करून द्यावे अन्यथा मनपा कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल.

– सागर गोरे (सामाजिक कार्यकर्ते, वाघोली)

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button