अंगणवाडी केंद्राना साहित्यांचे वाटप

वाघोली : अंगणवाडीतील सेवा अधिक प्रभावशाली बनवण्यासाठी आव्हाळवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या वतीने १५ वा वित्त आयोग व दहा टक्के बालकल्याण निधीमधून अंगणवाडी केंद्रांना संगणक, प्रिंटर, टेबल, खुर्च्या, व्हील चेअर, शेगडी, कुकर, धान्य कोठ्या, फॅन आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी हवेली पंचायत समिती सभापती नारायण आव्हाळे पाटील, सरपंच नितीन घोलप, उपसरपंच प्रशांत सातव, ग्रामपंचायत सदस्य मंगेश सातव, अमोल आव्हाळे, अविनाश कुटे, काकासाहेब सातव, सोमनाथ आव्हाळे, सदस्या अनुष्का सातव, कोमल आव्हाळे, बदामबाई आव्हाळ, सारिका सातव, सविता सातव, पल्लवी आव्हाळे, सोनाली दाभाडे, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

चिमुकल्यांना शैक्षणिक बोध देण्याचे काम अंगणवाडी केंद्रातून केले जाते. साहित्य वाटपामुळे अंगणवाडी केंद्र अधिक प्रभावशाली बनवण्यासाठी मदत होणार आहे.

– अनुष्काताई सातव (ग्रामपंचायत सदस्या, आव्हाळवाडी)

 

ग्रामीण भागातील अनेक अंगणवाड्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा ग्रामपंचायतीच्या खोल्यांचा वापर केला जातो. प्राथमिक शिक्षणाचे धडे घेणाऱ्या चिमुकल्यांचे मन रमेल व हसत खेळत शिक्षण घेता येईल याकरिता स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी पर्यंत करणार आहोत.

नितीन घोलप (सरपंच, आव्हाळवाडी), प्रशांत सातव (उपसरपंच, आव्हाळवाडी)

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button