कुलमुखत्यारपत्र व पुनश्च खरेदीखत दस्त नोंदणी करा

मनसे विधी विभागाच्या वतीने नोंदणी व मुद्रांक विभागाकडे मागणी

पुणे : कुलमुखत्यारपत्र आणि विनापरवानगी बांधलेल्या सदनिकांचे पुनश्च खरेदीखत (Resale Agreement) दस्त नोंदविण्यासाठी नकार देणाऱ्या सह दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करणेबाबत सूचना देण्यात याव्या अशी मागणी मनसे विधी विभागाच्या वतीने नोंदणी व मुद्रांक विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. दस्त नोंदणी करण्यास नकार दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे विधी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

पुणे शहर परिसरात दस्त नोंदणीसाठी जवळपास २८ सह दुय्यम निबंधक कार्यालयांची संख्या आहे. परंतु बहुतांश कार्यालयाकडून कुलमुखत्यारपत्र आणि विनापरवानगी बांधलेल्या सदनिकांचे पुनश्च खरेदीखत (Resale Agreement) दस्त नोंदविण्यासाठी नकार दिला जातो. मोठ्या संख्येने कार्यालये असताना सुद्धा केवळ काही कार्यालयामध्येच दस्त नोंदणी केली जाते. त्यामुळे समस्त वकीलवर्गाला आणि पक्षकारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबधित कार्यालयांकडून दस्त नोंदणी करण्यास नकार देणे अयोग्य आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक कार्यालयांना दस्त नोंदणी करण्याचे आदेश देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सह दुय्यम निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाने यांचेकडे विधी विभाग मनसेच्या वतीने देण्यात आले आहे.

विक्रीचे अधिकार देत असलेले कुलमुखत्यारपत्र सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी व विनापरवानगी बांधलेल्या सदनिकांचे पुनश्च खरेदीखत करण्याबाबत लवकरच परिपत्रक काढून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन हिंगाने यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी विधी विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश म्हस्के, पुणे जिल्हाध्यक्ष अॅड. अरविंद मते, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. भगवान थोरात व इतर सदस्य उपस्थित होते.

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button