Trending

Video: अजित दादांची शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका – ज्येष्ठांनी आशिर्वाद देण्याचे काम करावं

आम्ही अजून किती थांबायचं! - उपमुख्यमंत्री अजित पवार

लोहगाव/पुणे : आपल चुकलं तर ज्येष्ठांनी कान धरून सांगण्याचा अधिकार आहे. माझही वय आता ६० आहे.  अजून किती आम्ही थांबायच? व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माजी आमदार रामभाऊ मोझे जसे आशिर्वाद देत फिरतात, तसे आम्ही मानलेल्या दैवतांनी देखील आपल्याला आशिर्वाद दिले पाहिजे होते अशी टीका शरद पवार यांचे नाव न घेता अजित पवार यांनी केली.

लोहगाव येथील विविध विकास कामांच्या उदघाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी व्यापीठावर आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, माजी आमदार रामभाऊ मोझे, जेष्ठ नेते पांडुरंग खेसे, अशोकबापू खांदवे, राजेंद्र खांदवे, बंडू खांदवे, नवनाथ मोझे, मिलिंद खांदवे, डॉ. राजेश साठे, सतीश म्हस्के आदि मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. गोळीबार, दगडफेकच्या घटनांचा सरकारचा काहीही संबध नसताना विरोधक राजीनाम्याची द्या. सरकार बरखास्त करा अशी मागणी करता. मात्र सत्तेत २०० हून अधिक आमदार असताना विरोधक अशी कशी मागणी करतात असा टोला देखील पवार यांनी लगवला. आम्ही विकास कामांसाठी वेगळा निर्णय घेतला आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार जपले जातील. पुणेकरांच्या विश्वास तडा जाईल असे कोणतेही काम करणार नसल्याचा विश्वास याप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांनी दिला.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button