पीसीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तपदी विजयकुमार खोराटे यांची नियुक्ती
पिंपरी : महाराष्ट्र शासन आदेशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची महसुल व वनविभागाकडे नियुक्ती प्रत्यार्पित करण्यात आली असल्याने त्यांच्या जागी नुकतीच विजयकुमार खोराटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी २००५ मध्ये पोलीस अधिकारी या पदावर शासकीय सेवेत रुजू झाले. त्यानंतर त्यांनी वर्धा नगरपरिषद येथे मुख्याधिकारी, कोल्हापुर नगरपालिका येथे उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त, अमरावती महानगरपालिका येथे उपायुक्त तसेच सोलापूर महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त या पदांवर काम केलेले आहे.