वाघोली येथे लोकसभा प्रवास योजना संयुक्त मोर्चा संमेलन संपन्न
भाजपचे राष्ट्रीय महामंत्री संजय टंडन यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
- भाजपा हवेली तालुका युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील यांनी मागील तीन वर्षांच्या कारकिर्दीत युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने केलेल्या विविध कामाचा या कार्यक्रमामध्ये सविस्तर आढावा मांडला. यावेळी केंद्रीय महामंत्री संजय टंडन व केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी सातव व पदाधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.
वाघोली: वाघोली येथे लोकसभा संसद प्रवास योजनेअंतर्गत संयुक्त मोर्चा संमेलन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री संजय टंडन यांनी संसद प्रवास योजनेअंतर्गत संयुक्त मोर्चा संमेलनात मोदी सरकारच्या सर्व शासकीय योजनांबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा हवेली तालुकाध्यक्ष संदीप (आप्पा) भोंडवे यांनी केले होते.
कार्यक्रमप्रसंगी भोंडवे यांनी मतदार संघांची व विविध योजनांची माहिती मांडली. तर अनिल सातव पाटील यांनी शिरूर विधानसभा व लोकसभेची संक्षिप्त माहितीसह हवेली युवा मोर्चाच्या वतीने वाघोली व हवेलीत केलेल्या कार्याबाबत व भविष्यातील समग्र विकासासाठी आवश्यक योजना, समस्या आदींविषयी माहिती सादर केली. त्याबरोबर आघाड्या व मोर्चे अध्यक्षांनी केलेल्या कामाची माहिती देखील सादर केली.
या कार्यक्रमाला पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरीताई मिसाळ, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश (तात्या) भेगडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप (दादा) कंद, पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, शरद बुट्टे पाटील, दादा पाटील फराटे, शिरूर भाजपा अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रविण (नाना) काळभोर, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी, उपसभापती रवींद्र कंद, जयश्रीताई पलांडे, पुनमताई चौधरी, भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव गणेश (बापू) कूटे, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप (आबा) सातव, शामभाऊ गावडे, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष शरद आव्हाळे, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश सातव, गणेश चौधरी, भाजप हवेली तालुका सरचिटणीस विजय जाचक, महिला अध्यक्षा सुप्रियाताई गोते, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.