पीएमपीएमएल बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

वाघोली: तळेगाव ढमढेरे येथून पुणे मनपा कडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसने रस्ता क्रॉस करणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीस धडक दिल्याने त्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.६) रात्री साडे आठच्या सुमारास पेरणे फाटा येथील मराठा दरबार बिर्याणी हाऊसच्या समोर घडली. याप्रकरणी बसचालक परमेश्वर गोविंद गावडे (रा. वाघोली) यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात हयगयीने, निष्काळजीपणे बस चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार संदेश सेंगर यांनी फिर्याद दिली असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीची ओळख पटलेली नाही.