पथदिवे चालू न केल्यास महापालिका वाघोली कार्यालयाला टाळे लावणार

भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप सातव यांचा निवेदनाद्वारे इशारा

वाघोली :  विज बिले भरली नसल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केल्यामुळे वाघोलीतील पथदिवे बंद आहेत. बंद असलेली पथदिवे चालू केले नाहीतर महापालिकेच्या वाघोली संपर्क कार्यालयाला १ फेब्रुवारी रोजी टाळे लावणार असल्याचा इशारा भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्तांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

वाघोली येथील अनेक दिवसांपासून महापालिका वाघोली संपर्क कार्यालयाने वीज बिल भरले नसल्याने विद्युत महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला आहे. पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्यावेळी वृद्ध व्यक्ती, महिला, मुलांना बाहेर पडणे धोकादायक झाले आहे. कंपनीत रात्रपाळीला जाणाऱ्या-येणाऱ्या कामगारवर्गाला सुद्धा याचा सामना करावा लागत आहे. अंधारामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाघोली गाव क्षेत्रफळाने खूप मोठे असल्यामुळे अनेक भागामध्ये वाड्या वस्त्यांवर पथदिवे बसवण्यात आले होते. परंतु ते देखील बंद अवस्थेत असून अद्यापही दुरुस्त करण्यात आले नाहीत. त्यामुळे वाड्या वस्त्यांवरील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बंद असलेली पथदिवे ३१ जानेवारी पर्यंत चालू करावे अन्यथा महापालिकेच्या वाघोली संपर्क कार्यालयाला १ फेब्रुवारी रोजी टाळे लावणार असल्याचा इशारा भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्तांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. महापालिकेच्या संबधित अधिकारी यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही.

अनेक दिवसांपासून बंद असलेल्या लाईट बाबत पाठपुरवा केला असता बिल भरले नसल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला, त्यामुळे लाईट बंद आहेत असे सांगण्यात येते. महापालिका नागरिकांकडून कर गोळा करण्यासाठी जशी अग्रेसर भूमिका घेते तशीच भूमिका नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी का घेत नाही.

– संदीप सातव (भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस)

 

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button