सुभाषचंद्र बोस यांचे विचार प्रत्येकांनी मनात रुजविले पाहिजे – भाजप नेते गणेश कुटे
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

वाघोली : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश व हवेली तालुका भाजपच्या वतीने आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती २३ जानेवारी रोजी साजरी केली जाते. त्यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता म्हणून हा दिवस दरवर्षी ‘पराक्रम दिवस’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचा वाटा निभावला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडिसा मधील कटक येथे झाला. बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती होते. सुभाषचंद्र बोस यांचे वडील जानकीनाथ बोस हे व्यवसायाने वकील होते आणि त्यांची आई गृहिणी होत्या.
नेताजी यांचे प्राथमिक शिक्षण कटक येथील रेवेनशॉ कॉलेजिएट स्कूलमध्ये झाले. यानंतर त्यांचे पुढील शिक्षण कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये झाले. यानंतर त्यांच्या पालकांनी बोस यांना भारतीय नागरी सेवेची तयारी करण्यासाठी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात पाठवले. नेताजींनी १९२० मध्ये इंग्लंडमध्ये नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. नेताजी सुभाषचंद्र बोस लहानपणापासूनच भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित चळवळींमध्ये सहभागी होते. दुसरे महायुद्ध सुरु असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद सेनची स्थापना केली. सुभाष चंद्र बोस यांनी दिलेला ‘जय हिंद’चा नारा हा भारताचा राष्ट्रीय घोषवाक्य ठरला. त्याबरोबर ‘तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा’ हे त्यांचे भाषणही त्यावेळी खूप लोकप्रिय होते.
स्वातंत्र्य चळवळीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मोलाचा वाटा निभावला. त्यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता म्हणून हा दिवस दरवर्षी ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा केला जातो. नेताजींचे कार्य व विचार तरुणांसह प्रत्येकांनी मनामध्ये रुजवले पाहिजे.
– गणेश बापू कुटे (भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव)