युनिट सहाच्या पथकाने पकडला लाखो रुपयांचा गुटखा

अवैध गुटख्याची वाहतूक करणारा जेरबंद; ८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाघोली : गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने अवैध गुटख्याची वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून ८१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण दुर्योधन जाधव (वय २६, रा. गुरसाळे जि. सातारा) असे जेरबंद करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार (दि. २१ जानेवारी) रोजी गुन्हे शाखा युनिट-६ पथक गस्त करित असताना बातमीदारामार्फत लोणीकाळभोर हद्दीमधून सोलापूर रोडने एक आयशर ट्रक मोठ्याप्रमाणावर अवैध गुटखा घेवून जाणार असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने सापळा रचून थेऊर फाटा चौक, सोलापूर रोड येथे अवैध गुटख्याची वाहतूक करणारा आयशर ट्रक (क्र. एमएच ०१ सीएच ६०६८) पकडला. चालकास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता ट्रकमध्ये प्रतिबंधीत अन्नपदार्थ गुटखा असल्याचे निष्पन्न झाले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या उपस्थितीत ५६ लाख ४८ हजार ८२० रुपये किंमतीच्या एकूण १५० गुटख्याच्या गोण्या व वाहतुकीसाठी वापरलेला २४ लाख ५० हजार रुपये किंमतीचा आयशर ट्रक असा ८० लाख ९८ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. बाजारामध्ये दुप्पट किंमतीने विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले असून बाजारभावाने कोटी रुपयांचा हा गुटखा आहे. सुरक्षा अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकावर लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर व ज्योती काळे यांनी केली आहे.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button