असा केक तुम्ही या आधी बघितला नसेल.!
पिराजीस् फुड्स ब्रँडने अल्पावधीतच घेतली उंच भरारी

वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथील पिराजीस् फुड्स ब्रँडने अल्पावधीतच उंच भरारी घेत वाघोलीसह पुण्यामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पिराजीस् केकने महाराष्ट्रीयन पैठणी साडी आणि पारंपारिक दागिन्यांसह विविध व्हरायटीजमध्ये केक तयार केले आहेत. हुबेहूब पारंपारिक पैठणी साडी व दागिन्यांची कलाकृती तयार केली असून याला नागरिकांसह विशेषतः महिलांनी पसंती दर्शविली आहे.
पिराजीस् फुड्स ब्रँडने गुणवत्ता टिकवत अल्पावधीतच उंच भरारी घेत ग्राहकांमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. खास ग्राहकांच्या सेवेत पैठणी साडी व पारंपारिक दागिन्यांचा आकर्षक केक पिराजीस् फुड्सकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. पिराजीस् केकने साकारलेली अप्रतिम कलाकृती नागरिकांच्या पसंतील उतरली असून वाघोलीसह परिसरातून कौतुक होत आहे.
महाराष्ट्रीयन पैठणी साडी व पारंपारिक दागिने केकमध्ये अप्रतिम तयार केले असून या केकची महिलांकडून मोठ्याप्रमाणावर मागणी होत आहे. तसेच वेगवेगळ्या आकर्षक डिझाईनमध्ये केक उपलब्ध करत आहोत.
– सचिन सातव (संचालक, पिराजीस् केक)
पिराजीस् केकने महाराष्ट्रीयन पैठणी साडी आणि पारंपारिक दागिन्यांची अप्रतिम कलाकृती साकारली असून वाघोलीकरांसाठी निश्चीतच अभिमानाची बाब आहे.
– संजय सातव पाटील (मा. पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य)