अनधिकृत बांधकाम प्रकरणी केसनंद येथील पाच जणांवर गुन्हा दाखल

वाघोली : केसनंद (ता. हवेली) येथील गट नंबर ६१९ मध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पाच जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएमआरडीएचे सहाय्यक नगर रचनाकार ऋतुराज जाधव यांनी यांनी फिर्याद दिली आहे.
पाच जणांना बांधकाम परवानगी बाबत पीएमआरडीए कडून नोटीस बजावण्यात आली होती. नोटीसीचे पालन न केल्यास फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करणेबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३ (१ )अन्वये च्या नोटीसमध्ये नमूद केले होते. त्यानुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील महिन्यात अनधिकृत बांधकाम प्रकरणी वाघोली येथील बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करून १४ अनधिकृत रो हाऊस पीएमआरडीएने पाडले होते.