टायगर ग्रुपच्या वतीने गोरेगाव येथील प्रा. आ. केंद्रात कोरोना योध्यांचा सन्मान

राष्ट्रीय अध्यक्ष तान्हाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळांचे वाटप

गोरेगाव  :  टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तान्हाजी जाधव वाढदिवसानिमित्त गोरेगाव (जि. हिंगोली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा टायगर ग्रुपचे हिंगोली जिल्हाध्यक्ष अर्पित दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याबरोबर आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तान्हाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गोरेगाव येथील टायगर ग्रुपचे सदस्य दिपक कावरखे यांच्या वतीने प्राथमीक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, कर्मचारी यांनी कोरोना कार्यकाळात जीव धोक्यात घालून अहोरात्र रुग्णांची सेवा केली अशा कोरोना योध्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच शासकीय नियमांचे पालन करून आरोग्य केंद्रातील रूग्णांना फळांचे वाटप करून जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खेतान, डॉ. पिंपरे, डॉ. सुनिल कावरखे, डॉ. विजय इंगळे, डॉ. चौधरी, गणेश चोपडे, राजु धामनकर,  योगेश खिल्लारी, ग्रा. पं. सदस्य जि एम खिल्लारी, गजानन कावरखे, संतोष कावरखे, महाजन, गजानन धामनकर आदी उपस्थित होते.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button